कुसुंबा येथे विवाहितेची विहिरीत उडी घेवून आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । कौटुंबिक तणावातून विवाहितेने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना आज  दुपारी तालुक्यातील कुसुंबा शिवारात घडली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर माहिती अशी की,  संगिता प्रकाश मोहिते (वय-३३) रा. कुसुंबा ता.जि.जळगाव ह्या दोन मुलांसह राहतात. कुसुंबा हे माहेर आहे. घरातील वादातून पती काही महिन्यांपासून सोबत राहत नाहीत. त्यामुळे महिला कौटुंबिक तणावात होत्या. गावातच भाऊ बळीराम श्रावण बेलदार आणि आई चंद्रकला बेलदार हे राहतात. बळीराम यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने आज बुधवार २ जून रोजी संगिता मोहिते ह्या बांधकामाच्या ठिकाणी रोजंदारीवर कामाला आल्या होत्या. दुपारी १ वाजेच्या सुमारास बांधकाम मजुरांची जेवणाची सुट्टी झाली. त्यावेळी इतर मजूर जेवणाला बसले परंतू संगिता मोहिते ह्या जेवन न करता निघून गेल्या. कुसुंबा शिवारातील एका शेतात त्यांची उडी घेवून आत्महत्या केली. दरम्यान, त्यांचा शोधाशोध केली असता विहिरीजवळ त्याच्या चपला आढळून आल्या, विहिरीत त्यांनी आत्महत्या केल्याचे दुपारी २ वाजता उघडकीला आले. 

 

दोन तासानंतर महापालिकेच्या पथकाने मृतदेह बाहेर काढला. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह आणण्यात आला. शवविच्छेदन करण्यात आला असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मयत विवाहितेच्या पश्चात दोन भाऊ, आई, विशाल (वय-१४) व विक्की (वय-१२) ही दोन मुले असा परिवार आहे.  याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  पुढील प्राथमिक तपास पो.कॉ. सध्देश्वर डापकर, होमगार्ड चेतन लाड करीत आहे.

Protected Content