जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसोली येथील ३४ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज २४ मार्च रोजी सकाळी उघडकीला आली. शिरसोली गावात गळफास घेवून आत्महत्या करण्याची तीन दिवसात ही तिसरी घटना आहे. एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, समाधान कडू बारी (वय-३४) रा. शिरसोली प्र.बो. ता.जि.जळगाव हा पत्नी दिपाली व मुलगा दुर्गेस सह वस्तव्याला आहे. शेतीचे व मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गावातचे त्याचे दुसरे घर आहे. त्याच ठिकाणी रात्री झोपायला जातात. आज सकाळी घरी येवून अंघोळ करून पुन्हा दुसऱ्या घरी गेले. बराच वेळ झाल्यानंतर घरी न आल्याने घरचे सदस्य दुसऱ्या घरी गेले असता समाधान यांनी घरात कोणीही नसतांना गळफास घेवून आत्महत्या केल्याचे सकाळी ७ वाजता उघडकीला आला. मृतदेह तातडीने खाली उतरवून जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषीत केले. मयताच्या पश्चात आई अंजनाबाई बारी, पत्नी दिपाली, सहा वर्षाचा मुलगा दुर्गेश, लहान भाऊ असा परिवार आहे. याघटनेची एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.