रामेश्वर कॉलनीत अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

 

जळगाव, प्रतिनिधी । रामेश्वर कॉलनीत राहणाऱ्या १६ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी ७.३० वाजता उघडकीस आली. या घटनेमागचे कारण स्पष्ट झालेले नाही.

योगिता लिलाधर जयकर (वय १६, रा.स्वामी समर्थ मंदिराजवळ, रामेश्वर कॉलनी) असे मृत मुलीचे नाव आहे. योगिता ही कुटंुबियांसह राहत होती. दरम्यान, शनिवारी मध्यरात्री ती घराशेजारील एका रिकाम्या खोलीत आली. तेथे तीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

सकाळी ७.३० वाजता ही बाब कुटंुबियांच्या लक्षात आली. यानंतर त्यांनी योगिता हिला खाली उतरवुन दोन रुग्णालयांमध्ये नेेले. तत्पूर्वी तीचा मृत्यू झालेला होता. योगिताने आत्महत्या का केली? याचे कारण स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्माम मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. योगिताच्या पश्चात आई, मोठी बहिण व लहान भाऊ असा परिवार आहे.

Protected Content