नाशिक (वृत्तसंस्था) ऐन लग्नाच्या तोंडावर नवरदेवाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशकात घडली आहे. निखिल देशमुख या तरुणाचा विवाह आज (शनिवार) नाशिक शहरातील एका प्रतिष्ठित कुटुंबातील तरुणीशी होणार होता. परंतु हळदीच्या आदल्या दिवशीच त्याने आत्महत्या केल्यामुळे प्रचंड खळबळ उडालेली आहे.
मयत निखिल देशमुख हा नाशकातील सातपूर परिसरातील कंपनीत तो नोकरी करत होता. त्यामुळे कंपनीजवळ बळवंतनगरमधील एका फ्लॅटमध्ये निखिल राहत होता. गुरुवारी एकीकडे घरात लग्नाची जय्यत तयारी सुरु असताना फ्लॅटवर त्याने गळफास घेतला. दरम्यान, मी आयुष्यात काहीही करु शकलो नाही, म्हणून मी जीवन संपवत आहे, असा मजकूर असलेली चिठ्ठी निखिलच्या मृतदेहाजवळ पोलिसांना सापडली आहे.