Home क्राईम चितोडा येथे तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

चितोडा येथे तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

0
44

यावल ( प्रतिनिधी) तालुक्यातील चितोडा गावात सासुरवाडीला राहण्यास आलेल्या एका तरूण शेतमजुराने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली असून त्या तरूणास पुढील उपचाराकरीता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

 

याबाबतचे वृत असे की, यावल तालुक्यातील फैजपुर रोडवर असलेल्या चिळोदा या गावातील शेतमजूरी करणाऱ्या गणेश नारायण बाबर (वय३५ वर्ष) याने आज रविवार २८ एप्रील रोजी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. दुपारच्या सुमारास यावल शिवारातील मधुकर एकनाथ भंगाळे यांच्या शेतात कामावर गेला असता त्याने रागाच्या भरात तेथे पिकांवर फवारणीसाठी आणलेले विषारी औषध प्राशन केले. त्यास उपचारासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यास प्रथमपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound