मुंबई प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे स्मारक आणि यावल येथे महर्षी व्यास यांच्या स्मारकासाठी आमदार एकनाथराव खडसे यांनी शासनाकडे निधी मागितला होता. त्या संदर्भात आज विधानसभेत राज्याचे वित्त, नियोजन आणि वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निधीसाठी प्रस्ताव मागविला आहे.
माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांनी विधानसभेत जिल्ह्याच्या विविध कामांसाठी निधीची मागणी केली होती. यात निराधार योजनेंतर्गत बुध्द कलावंत यांच्या मानधनात वाढ व्हावी, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकासाठी निधी, यावल येथे महर्षी व्यास यांच्या स्मारकासाठी निधी, शेतीसाठी लागण्याच्या यंत्रे सामग्रीवरील जीएसटी कमी करणे, पंचायत समिती सभापतीच्या मानधनात वाढ यासह इतर मागण्या शासनाकडे केल्या होत्या. यावर आज झालेल्या विधानसभेच्या कामाकात राज्याचे वित्त, नियोजन आणि वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निधीसाठी प्रस्ताव मागविला आहे.