Home Cities जळगाव सुधाकर माळी यांचा राज्यस्तरीय कामगार भूषण पुरस्काराने सन्मान

सुधाकर माळी यांचा राज्यस्तरीय कामगार भूषण पुरस्काराने सन्मान


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील कामगार सुधाकर प्रल्हाद माळी यांना कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवनात राज्य गुणवंत कामगार असोसिएशन व जागृत नागरिक सेवा संस्था, महाराष्ट्र यांचा संयुक्त विद्यमाने आयोजित समारंभामध्ये राज्यस्तरीय कामगार भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मानाचा फेटा, शाल, मानपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यक्रमांमध्ये माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, राजयोगिनी ब्रह्मकुमारी सुनंदा दीदी, कोल्हापूरचे सहाय्यक कामगार आयुक्त विशाल घोडके, राज्य गुणवंत असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर तसेच पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये सुधाकर माळी यांना गौरवण्यात आले. सुधाकर माळी यांना मिळालेला पुरस्कारबद्दल त्यांचे जळगाव शहरातील विविध क्षेत्रांमधून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.


Protected Content

Play sound