
यावल (प्रतिनिधी) कोपरगाव ( जि. अहमदनगर ) येथील समतानगरातील रहिवासी सुधाकर उर्फ आबा गंगाधर वाणी (वय ७६) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले.
सुधाकर वाणी यांच्यावर आज सकाळी नऊ वाजता शोकाकुल वातावरणात कोपरगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे. गृहरक्षक दलाचे यावल तालुका समादेशक भानुदास कवडीवाले यांचे ते सासरे होत.