यावल प्रतिनिधी । तालुक्यातील पथराळे येथे एका शेतमजुराची अचानक मृत्यू झाल्याची घटना घडली असून यावल पोलीसात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहिदास मारूती कोळी (रा.राकोलाड तालुका रोहा जिल्हा रायगड; ह.मु.पथराळे तालुका यावल) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. रोहिदास कोळी यांनी दुपारी जेवण केल्यानंतर अचानक उलट्या होत असून त्यांना अति प्रमाणात त्रास जाणवत असल्याने तात्काळ मनवेल येथे दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र दवाखान्यात पोहोचण्याआधीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्याचवेळी मृत अवस्थेतील मृतदेह पुन्हा तो राहत्या घरी आणले व नंतर यावलच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. या घटनेची खबर रमेश जाधव (रा.राकोलाड तालुका रोहा जिल्हा रायगड) यांनी यावल पोलीसात खबर दिल्याने अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले हे तपास करीत आहे