जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात नुकतेच सुरू झालेले महादेव सुपरस्पेशालिटी रुग्णालय आता दर्जेदार वैद्यकीय सेवांमुळे चर्चेत आले आहे. किडनी स्टोनसारख्या गंभीर समस्येवर येथे नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून, गेली दोन वर्षे या त्रासाने हैराण झालेल्या एका एस.टी. महामंडळ कर्मचाऱ्याला दिलासा मिळाला आहे.

५५ वर्षीय या रुग्णाला लघवीच्या तक्रारी, तीव्र पोटदुखी व वारंवार होणाऱ्या संसर्गामुळे मोठा त्रास सहन करावा लागत होता. अनेक ठिकाणी उपचार करूनही फरक न पडल्याने त्याचे दैनंदिन जीवन आणि नोकरीवरही परिणाम झाला होता. अखेर त्याने महादेव सुपरस्पेशालिटी रुग्णालयात उपचार घेण्याचा निर्णय घेतला. येथे दाखल झाल्यानंतर, युरोलॉजी तज्ज्ञांच्या टीमने आवश्यक तपासण्या करून त्याच्या किडनीत ३० मिमी व्यासाचा मोठा स्टोन असल्याचे निदान केले.

त्यानंतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दुर्बिणीद्वारे स्टोनचे तुकडे करत शस्त्रक्रिया पार पाडण्यात आली. ही शस्त्रक्रिया युरोलॉजी विभाग प्रमुख डॉ. हेमंत केळकर, डॉ. शुभम चौधरी, डॉ. श्रीकांत रेड्डी आणि डॉ. फावडे यांच्या टीमने यशस्वीरीत्या पूर्ण केली. बधिरीकरण विभागात डॉ. भरत सोनवणे, डॉ. आकांक्षा, डॉ. विदीशा यांनी कौशल्य दाखवले. शस्त्रक्रियेवेळी नर्सिंग स्टाफ समीर आणि समृद्धी येवले यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती झपाट्याने सुधारली असून, पोटदुखी आणि लघवीतील त्रास पूर्णपणे नाहीसा झाला आहे. रुग्णाने महादेव रुग्णालयातील डॉक्टर व संपूर्ण टीमचे आभार मानत समाधान व्यक्त केले.
विशेष म्हणजे, किडनी स्टोन ही समस्या सर्वसामान्य असली तरी वेळेत निदान आणि उपचार न झाल्यास ती जीवघेणी ठरू शकते. लघवी करताना वेदना, रक्तमिश्रित लघवी, पाठीमध्ये किंवा पोटात तीव्र वेदना ही लक्षणे दिसल्यास तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. सुदैवाने, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अशा शस्त्रक्रिया आता अल्पवेळात, सुरक्षितपणे आणि वेदनारहितपणे होऊ शकतात.



