मांडवेदिगर येथे मोतीमाता देवीच्या यात्रोत्सवाची जय्यत तयारी

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील गारखेडा येथून जवळ असलेल्या मांडवेदिगर येथेमोतीमाता देवीच्या जागृत देवस्थानाचे वार्षिक यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १३ आणि १४ जानेवारी रोजी मोतीमाता मंदिर ट्रस्ट, मांडवेदिगर यात्रोत्सवाचे आयोजन केले असून बंजारा समाजाच्या कुलस्वामिनी असलेल्या मोतीमाता देवीच्या भक्तांनी मोठ्या प्रमाणावर या यात्रोत्सवात सहभाग नोंदविणार आहे अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

या कार्यक्रमाला संपूर्ण खान्देश तसेच राज्यभरातील बंजारा समाजबांधव आणि अन्य समाजबांधवही उपस्थित राहणार आहेत. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम आणि उत्सव आयोजित करण्यात येणार आहेत. यात्रोत्सवाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक पोलिस पाटील रविंद्रजी पवार, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, तसेच गावातील युवक मंडळ, सामाजिक कार्यकर्ते आणि भुसावळ तालुका पोलिस प्रशासन हे परिश्रम घेत आहे.

यात्रोत्सवाच्या निमित्ताने देवस्थान परिसरामध्ये विविध व्यापारी, मिठाई दुकानदार, भांडी-खेळणी दुकानदार यांनी आपली दुकाने लावावीत असे आवाहन मोतीमाता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सरिचंद पवार यांच्यासह उपाध्यक्ष गजानन पवार, सचिव गोविंद पवार, खजिनदार चरणदास पवार,सहसचिव संत्रीबाई पवार,सदस्य हरिभाऊ पवार, भगवानजी पवार, गणेश पवार,यांच्यासह सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे आवाहन करण्यात आले आहे.

Protected Content