Home Cities जामनेर गोदरी येथे होणाऱ्या बंजारा समाज महाकुंभ कार्यक्रमाची जय्यत तयारी !

गोदरी येथे होणाऱ्या बंजारा समाज महाकुंभ कार्यक्रमाची जय्यत तयारी !


जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील गोदरी येथे होणाऱ्या बंजारा समाज महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास्थळी स्वयंसेवकांनी भेट देवून पाहणी केली आहे.

जामनेर तालुक्यातील गोदरी येथे २५ ते ३० जानेवारी दरम्यान होणाऱ्या बंजारा व लबाना नायकडा समाज महाकुंभ काही दिवसांवर येऊन ठेपले असून या कुंभाजी जय्यत तयारी सुरू आहे. १ जानेवारी रोजी महाकुंभ नियोजनातील मुख्य समितीसह वेगवेगळ्या १९ समितीचे स्वयंसेवक व कार्यकर्त्यांनी महाकुंभ तयारी जागेची पाहणी केली. यावेळी परमपूज्य श्याम चैतन्य महाराज सुरेशजी महाराज, नंदूजी रामेश्वर नाईक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमाबद्दल स्वयंसेवकांना मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये मुख्य सभास्थळ व संत निवास पुरुष निवास महिला निवास फत्तेपूर गावाच्या जवळच असलेल्या जागेवर करण्यात आले. या ठिकाणी विविध सुविधा उपलब्ध करण्यासाठी जागेचे नियोजन करण्यात आले आहे. सदर स्वयंसेवकांना महाकुंभाच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी अहोरात्र प्रयत्न करा, असे आव्हान यावेळी करण्यात आले.


Protected Content

Play sound