पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोहा नगरपालिकेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी चंद्रकांत सोमा माळी यांनी नगरपरिषदेच्या अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी विशेषत्वाने डिझाईन केलेल्या स्थानिक स्वराज्य सेवा पदविका अभ्यासक्रमात यश प्राप्त केले आहे.
पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशासकीय कामकाज करतांना अनेक अडचणी येतात. मात्र त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी शासनाने पदविका अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत चंद्रकांत माळी यांनी प्रथम प्रयत्नात यश मिळविले आहे.
चंद्रकांत माळी हे गेल्या २० वर्षापासून नगरपालिका येथे सहाय्यक प्रकल्प अधिकारी या पदावर कार्यरत असून दीनदयाळ अंत्योदय योजना, सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना, स्वच्छ भारत अभियान, रमाई आवास योजना, मराठा आरक्षण, जनगणना २०११, सामाजिक आर्थिक जातनिहाय जनगणना, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, पी.एम. स्वनिधी, स्वनिधी से समृद्धी, पथविक्रेत्याना सहाय्य, पथविक्रेता निवडणूक, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक विधानसभा सार्वत्रिक निवडणुक, नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक, पंचायत समिती व जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुक, ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक, शेतकीसंघ सार्वत्रिक निवडणूक, कृषिउत्पन्न बाजार समिती सार्वत्रिक निवडणूक, इत्यादि विविध निवडणूका यात मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी म्हणून त्यांनी कामकाज बघितले असून प्रशासनातील दीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.
स्थानिक स्वराज्य सेवा पदविका अभ्यासक्रम (LGS) यासाठी मुख्याधिकारी तथा प्रशासक किशोर चव्हाण, तत्कालीन मुख्याधिकारी ज्योती भगत ,डॉ. विजयकुमार मुंडे सतीश दिघे, सेवानिवृत्त लेखापाल. सोमा माळी छत्रपती संभाजी नगर येथील विभागीय संचालक अभिजित गाडगे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यावेळी चंद्रकांत माळी यांचे आस्थापना प्रमुख यामिनी जटे,पाणीपुरवठा अभियंता प्रियंका जैन,संघमित्रा संदानशिव, राहुल साळवे, पुष्पा भोकरे, नूतन पाटील, मनिषा चौधरी, अर्चना पाटील, पूनम पाटील, दिपक महाजन, राहूल प्रजापती, भूषण महाजन, शुभम कंखरे यांनी अभिनंदन केले.