Home Cities भुसावळ युपीएससीच्या पहिल्याच प्रयत्नात अनिकेत सचानचे यश

युपीएससीच्या पहिल्याच प्रयत्नात अनिकेत सचानचे यश


भुसावळ प्रतिनिधी । शहरातील अनिकेत सचान या विद्यार्थ्यांने युपीएससी परिक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात रॅक २८५ क्रमांक मिळवून बाजी मारली आहे. त्याने मिळविलेल्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

अनिकेतचे शिक्षण शहरातील केंद्रीय विद्यालयात झाले आहे. सुरूवातीपासून हुशार असल्याने दहावीच्या परिक्षेत ९५ टक्के तर बारावीच्या परिक्षेत ९६.२ टक्के मिळाले होते. त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात आईआईटी वाराणसी येथील इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागात प्रवेश मिळाला होता. महाविद्यालयीन शिक्षणासह यूपीएससी परिक्षेची तयारी करीत होता. अनिकतेचे वडील विनयकुमार सचान हे भुसावळ रेल्वे स्थानकावर मुय तिकीटर निरीक्षक पदावर कार्यरत आहे. आई मंजूषा सचान ह्या गृहिणी असून बहिण आयुषी सचान ही एम्स दिल्ली येथून एमबीबीएचे शिक्षण घेत आहे. या यशाचे श्रेय अनिकेतने आपल्या परिश्रमासह आई, वडील, नातेवाईक, शिक्षक, मित्र व परिवराला दिले आहे.


Protected Content

Play sound