Home राज्य ‘पोलीस महासंचालकपदी’ सुबोध जयस्वाल तर ‘मुंबई पोलीस आयुक्त’पदी संजय बर्वे

‘पोलीस महासंचालकपदी’ सुबोध जयस्वाल तर ‘मुंबई पोलीस आयुक्त’पदी संजय बर्वे


323337 jayswalbarve

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर आज सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्याजागी मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावर कार्यरत असणाऱ्या सुबोध जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, ‘मुंबई पोलीस आयुक्त’ पदावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे संजय बर्वे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

 

दत्ता पडसलगीकर यांच्यानंतर सेवा जेष्ठतेनुसार सुबोध जयस्वाल यांचाच क्रमांक लागतो. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी दत्ता पडसलगीकर हे निवृत्त होणार होते. मात्र राज्य सरकारने त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिली. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये आणखी तीन महिन्यांची मुदत वाढवून दिली होती. राज्य सरकारला पडसलगीकरांना दोन वर्षांची मुदतवाढ द्यायची होती मात्र केंद्र सरकारने राज्याची मागणी फेटाळून लावली. दुसरीकडे तर संजय बर्वे हे १९८६ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound