अमळनेर( प्रतिनिधी) उन्हांच्या तीव्रतेत वाढ होत असल्याने यापासून दिलासा मिळविण्यासाठी नागरिक विविध उपाय योजना करत असतात. मात्र, पशु, पक्षांना जंगल तोड झाल्याने पाण्यासाठी तसेच अन्न मिळविण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सुभराऊ फाऊंडेशतर्फे पक्षांना अन्न मिळावे यासाठी नागरिकांना दाणे घर बॉक्स वाटप करण्यात आले आहेत. या दाणे बॉक्सचा फायदा पक्षांना होणार आहे.
सुभराऊ फाऊंडेशचा दाणे घर बॉक्स वाटपाने भर उन्हांत पक्षांना धान्यासाठी भटकंती करावी लागणार नाही हा या संकल्पनेमागचा हेतू आहे. त्यामुळे संस्थेचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. आज शुक्रावर 10 मे रोजी सुभराऊ फांऊंडेशन,भालेराव नगर अमळनेर यांच्यातर्फे उन्हाळ्यात पक्ष्यांना दाणे टिपण्यासाठी घराबाहेर लावण्यासाठी पक्षी दाणे घर(बॉक्स) वाटप करण्यात आले. वाटप करताना अध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील,उपाध्यक्ष संतोष पाटील, सचिव उषा आर. पाटील आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.