जिल्हा परिषद क्रीडा स्पर्धेत उपशिक्षक समाधान जाधव प्रथम

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे ११ व १२ जानेवारी २०२५ रोजी पार पडलेल्या जळगाव जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये भुसावळ तालुक्यातील शिंदी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उपशिक्षक समाधान जाधव यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.

समाधान जाधव यांनी १०० मीटर धावणे स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला, तर ४०० मीटर धावणे स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित कुमार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा कुडचे, माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, व प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

पुरस्कार वितरण समारंभाला जळगाव जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुख, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, तसेच क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी असलेल्या शिक्षक-शिक्षिका आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाधान जाधव यांच्या या यशाबद्दल भुसावळ तालुक्याचे गटविकास अधिकारी डॉ. सचिन पानझडे, गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, सहाय्यक गटविकास अधिकारी डी. जी. जाधव, कनिष्ठ प्रशासन अधिकारी सचिन पाठक, भांडारपाल सुनील उबाळे, तसेच तालुक्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व शिक्षिका यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Protected Content