फैजपूर (प्रतिनिधी) येथील पोलीस उपनिरीक्षक आधार निकुंभे हे दि.३१ में रोजी सेवानिवृत्त झाले. निकुंभे यांनी आपल्या ३६ वर्षाच्या पोलीस दलाच्या सेवेचा त्यांनी आपली पोलीस दलात वेगळीच छाप पाडली होती. त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम नुकताच फैजपूर पोलीस स्थानकाच्या आवारात घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजक सपोनि दत्तात्रय निकम होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फैजपूर शहर पत्रकार संघ अध्यक्ष योगेश सोनवणे होते. यावेळी सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक आधार निकुंभे यांच्या कार्याची माहिती सपोनि दत्तात्रय निकम यांनी दिली. ३६ वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी पोलीस दलात उत्कृष्ठ असे कार्य केले असून त्यांना संपूर्ण सेवेमध्ये त्यांच्याविरुद्ध साधा एक तक्रारी अर्जही झालेला नाही. त्यांनी निष्कलंकपणे आपली सेवा बजावली, असेही यावेळी सपोनि दत्तात्रय निकम यांनी सांगितले.
यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश सोनवणे, कार्याध्यक्ष वासुदेव सरोदे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश महाजन, यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती पोलीस उपनिरीक्षक आधार निकुंभे आपल्या मनोगतात पोलीस हा समाजाचा आरसा असून त्यामध्ये प्रामाणिकपणे सेवा केल्यास सेवाही चांगली होत असते. ३६ वर्षात माझ्या हातून जी सेवा झाली त्यात मी खूप समाधानी आहे. हे सांगत असतांना ते भावनिक झाले होते. या कार्यक्रमाला शहरातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.