Home Cities जळगाव अभ्यास – एक आनंद यात्रा’ सेमिनार जळगावात यशस्वी; महायोगी प्रेम जींच्या मार्गदर्शनातून...

अभ्यास – एक आनंद यात्रा’ सेमिनार जळगावात यशस्वी; महायोगी प्रेम जींच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास

0
172

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  महायोगी प्रेम जी प्रणित स्टुडंट प्रेमशक्ति योग या जागतिक अभियानांतर्गत “अभ्यास – एक आनंद यात्रा” या प्रेरणादायी सेमिनारचे आयोजन दिनांक ९ सप्टेंबर २०२५ रोजी जळगावातील म.न.पा. शाळा क्र. २३ मध्ये पार पडले. शिक्षण क्षेत्रात कार्यरत परमेश्वरी – हाथ उन्नती के… संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना अभ्यास आनंदाने आणि तंत्रशुद्ध पद्धतीने कसा करावा, याचे मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे स्टुडंट प्रेमशक्ति योग चे संस्थापक श्री महायोगी प्रेम जी यांचे सुसंवादात्मक आणि सोप्या भाषेतील प्रभावी मार्गदर्शन. त्यांनी विद्यार्थ्यांना मेंदूचा प्रभावी वापर, पंच ज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने अभ्यास स्मरणात कसा ठेवावा, कमी वेळेत अधिक अभ्यास कसा करावा आणि आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे कसे जावे, याचे अभ्यासपूर्वक आणि सहज उदाहरणांसह मार्गदर्शन केले.

“अभ्यास म्हणजे ताण नाही, तर तो आनंदाचा प्रवास असावा,” हे त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनात ठासून रुजवले. त्यांच्या मार्गदर्शनात Happiness in Study, Success will follow you या उक्तीचा प्रत्यय विद्यार्थ्यांना आला. श्री प्रेम जींनी विद्यार्थ्यांशी केलेल्या सुसंवादात त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना विद्यार्थ्यांनी तात्काळ उत्तरे देत आपली चांगली ग्रहणशक्ती दाखवली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी परमेश्वरी – हाथ उन्नती के… संस्थेच्या संचालक डॉ. विद्या चौधरी यांनी या अभियानाची संकल्पना, उद्दिष्ट आणि त्यामागील दृष्टीकोन याचे प्रभावी विवेचन केले. त्यांनी बॅनरवरील महायोगी प्रेम जींच्या उक्तीचा अर्थ उलगडून सांगत विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नीलिमा लोटे, शिक्षक वर्ग, सर्व विद्यार्थी तसेच संस्थेच्या मुख्य समन्वयक सौ. श्रुती चौधरी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाने उपस्थित सर्वांना एक सकारात्मक ऊर्जा प्रदान केली.

हा सेमिनार विद्यार्थ्यांच्या मनात अभ्यासाबद्दल नवीन दृष्टिकोन निर्माण करणारा, प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरला. जिथे अभ्यास म्हणजे एक संघर्ष वाटतो, तिथे या सेमिनारने तो एक आनंदयात्रा असू शकतो, हे प्रभावीपणे दाखवून दिले.


Protected Content

Play sound