यावल- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावलशहरातील बालसंस्कार विद्या मंदिर शाळेत जागतिक योग दिनाच्या निमित्ताने २१ जून २०२४ रोजी सकाळी १० वाजता शाळेच्या परिसरात अंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
इयत्ता पहिली ते इयत्ता सातवीचे एकूण ४८५ विद्यार्थी व १३ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत योग दिन उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांना कृतियुक्त मार्गदर्शन प्रशांत महाजन, पंढरीनाथ महाले, सविता वारके यांनी केले. सदर प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सुनील माळी यांनी विद्यार्थ्यांना निरोगी व सुदृढ आरोग्यासाठी दैनंदिन जीवनात नियमित योग करणे बाबतचे महत्व सांगितले व आजपासून नियमित योग करण्याचे आवाहन केले. तसेच आपल्या आईवडील यांना पण योगा करण्याचा आग्रह करावा असे सांगितले. कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.आसन व्यवस्था सुनील श्रावगी व प्रकाश जयकारे यांनी तर फलकलेखन पुरुषोत्तम साठे व संजय चौधरी सर यांनी केले.