जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त जळगाव जिल्हा पोलीस दल, भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन, युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिस दलातील विविध विभागाच्या साहित्याचे प्रदर्शन आज शहरातील काव्यरत्नावली चौकात भरविण्यात आले होते.
या प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके, पोलीस उप अधिक्षक नीलभ रोहण यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी रामानंद नगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक अनिल बडगुजर, राखीव पोलीस दलाचे पो. नि. सुभाष कावरे, पोलीस बँड पथकाचे मेजर सलिम खान, युवाशक्ती फाऊंडेशनचे विराज कावडीया आदि उपस्थित होते. या प्रदर्शनाला शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त हजेरी लावली होती.
या प्रदर्शनात श्वान पथक, बाँम्ब शोध व नाशक पथक, बिनतारी संदेश पथकाच्या साहित्याचे प्रदर्शन लावण्यात आले होते. यावेळी शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनास भेट देऊन तेथील साहित्याची माहिती करुन घेतली.