युवास्पंदन मध्ये विद्यार्थ्यांनी लुटला मनमुराद आनंद

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मूळजी जेठा महाविद्यालयाच्या, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयीच्या युवा स्पंदन वार्षिक स्नेह समनेलनात दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमांची सुरुवात प्राचार्य, प्रा.संजय भारंबे यांच्याहस्ते नटराज पूजन करून करण्यात आली.

सकळाच्या सत्रात गीत गायन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी गीत मानवा लागे रे..,देख तूनी बायको कशी नाची रयानी. चंद्रा.., संदेसे आते है.. हाई झुमका वाली पोर..मेरे ढोलना…झिंगाट..इ. मराठी, हिंदी,खान्देशी भाषेतील लोकप्रिय गीते सादर केली. समीक्षा माकोडे या प्रज्ञाचक्षु विद्यार्थ्यांनीने सादर केलेल्या गीतास विद्यार्थ्यांनी विषेश प्रतिसाद दिला. या गीत गायनस्पर्धेचे परीक्षण
सत्यम कुलश्रेष्ठ, प्रा.कपिल शिंगणे यांनी केले, त्यांनतर विद्यार्थ्यांनी भारतीय पारंपरिक पोशाख स्पर्धत मराठी, गुजराथी, बंगाली, पंजाबी, मद्रासी, केरळी,इ वेशभूषा साकारून भारतीय पोशाखांचे महत्व उपस्थित विद्यार्थ्यांना पटवून दिले. तर दुपारच्या सत्रात एकूण 213 विद्यार्थ्यांनी विविध नृत्याचे दिलखेच आविष्कार दाखवून देत, उपस्थित्यांची मने जिंकली. जोगवा, मराठी गीते, दाक्षिणात्य नृत्ये, बॉलिवूड, शास्त्रीय नृत्य, तसेच अहिराणी, खान्देशी पावरी नृत्यांवर उपस्थित विद्यार्थ्यांनी ठेका धरला, ह्यादोन दिवस होत असलेल्या या युवा स्पदन स्नेह संमेलनाचा पारितोषिक वितरण केसीई सोसायटीचे सचिव मा.प्रमोद पाटील, केसीई सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी व सांस्कृतिक समनव्यक मा.शशिकांत वडोदकर यांच्या हस्ते करण्यात आले.

महाविद्यालयातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून विद्यान शाखेतील भाग्यश्री दुसाने निवड करण्यात आली तर प्रणाली नारखेडे विज्ञान शाखा, कृतिका कुलकर्णी वाणिज्य शाखा,उन्नती फुसे कला शाखा तर दर्शना सूर्यवंशी किमान कौशल्य शाखा असे शाखा निहाय प्रिन्सिपल रोल ऑफ ओनर हे किताब सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून गौरविण्यात आले. प्राचार्य प्रा. संजय भारंबे हे पारितोषिक वितरण समारंभाचे अध्यक्ष होते, उपप्राचार्या करुणा सपकाळे यांनी महाविद्यालयाचा अहवाल सादर केला , कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.शोभना कावळे यांनी तर ,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन इशा वडोदकर यांनी केले .

Protected Content