जळगाव खुर्द, तिघ्रे व खिर्डी येथे विद्यार्थ्यांनी सादर केले पथनाट्य

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  ३ ऑगस्ट ह्या जागतिक अवयवदान दिनानिमित्‍त गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातर्फे जळगाव खुर्द येथे आज सकाळी रॅली काढून जनजागृती करण्यात आली. अवयव दान ही काळाची गरज असून अवयव दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, याचे महत्व नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना पटवून दिले.

 

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे देण्यात आलेल्या अध्यादेशानुसार आझादी का अमृत महोत्सवांतर्गत आज गुरुवार ३ ऑगस्ट रोजी गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातर्फे अवयवदान जनजागृती निर्माण करण्याकरीता महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो), स्वयंसेवक, रेडक्रॉस व शिक्षकांच्या सहभागाने जळगाव खुर्द, तिघ्रे व खिर्डी या गावामध्ये रॅलीद्वारे तसेच पोस्टर्सद्वारे अवयवदानाचे महत्व पटविण्यात आले. या उपक्रमासाठी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी स्वत: पोस्टर्स तयार केले व सुरेख पोस्टर्स द्वारे आज रॅली उत्साहात संपन्न झाली.

 

याप्रसंगी पथनाट्याचे सादरीकरण करुन अवयव दानाच्या महत्वाविषयी ग्रामस्थांचे लक्ष वेधण्यात आले तसेच गावातील शाळांमध्ये देखील विद्यार्थ्यामध्येही यावेळी जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी अवयदाव दानाबाबत अवयदान प्रतिज्ञा घेण्यात आली. या उपक्रमासाठी सर्व शिक्षकवृंदाचे अनमोल सहकार्य लाभले.

Protected Content