जळगाव (प्रतिनिधी) शहरातील शिव कॉलनी येथील सरस्वती विद्या मंदिर या शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी जांभुळ, सिताफळ, गुलमोहर, नीम, गुलमोहर, नीम या बियांचे संकलन करून २०० सीडबॉल बनवून मारोती पार्क परिसरात रस्त्याच्या कडेला लागवड केले. यावेळी झाडे लावा, पर्यावरण वाचवा हा संदेश देण्यात आला.
वाढते तापमान,कमालीचा उकाडा,पाण्याचे दुर्भिक्ष, पावसाची अनिश्चिती,जास्त प्रमाणात झालेली वृक्ष तोड यामुळे भविष्यात होणारे दुष्परिणाम लक्षात घेत व शासनाने केलेल्या ३ कोटी वृक्षा रोपण या संकल्पनेस हातभार लावण्यासाठी सीडबॉलचा उपक्रम राबविण्यात आला. या वेळी सुवर्णा अडकमोल व सविता ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना सीडबॉल बाबत माहिती देत मार्गदर्शन करत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी असे उपक्रम राबविले पाहिजे, असे मत व्यक्त केले. या उपक्रमास मारोती पार्क परिसरातील महाराष्ट्र राज्य प्राधिकरण अधिकारी अभियंता व संस्थेचे अध्यक्ष मनोज पाटील उपस्थित होते. तसेच उपक्रमाचे आयोजन व नियोजन सुवर्णलता अडकमोल व सविता ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वसाने मॅडम यांनी या उपक्रमाला प्रोत्साहन दिले. तर देतभारंबे मॅडम, सुदर्शन पाटील सर.यांनी सहकार्य केले.