एरंडोल प्रतिनिधी । आता एरंडोल आणि रिंगणगाव महसूल विभागातील विद्यार्थ्यांना मोफत पास मिळणार असून यामुळे विद्यार्थ्यांची कधीपासूनची मागणी पूर्ण होणार आहे.
शिवसेनेचे तालुका प्रमुख वासुदेव पाटील यांनी नुकतेच परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना निवेदन दिले होते. एरंडोल तालुक्यातील उत्राण व कासोदा या महसूल विभागातील विद्यार्थ्यांना मोफत पास योजनेत समाविष्ट करण्यात आले होते. एरंडोल व रिगंणगाव हे दोन महसूल विभाग मात्र ८ जानेवारी रोजी दुष्काळ ग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आल्याने ह्या विभागातील विद्यार्थ्यांना मोफत पास योजनेचा लाभ मिळत नव्हता. यामुळे या विभागातील विद्यार्थ्यांनाही ही सवलत मिळण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली होती. वासुदेव पाटील यांनी या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केला. याला परिवहन मंत्र्यांनी मान्यता दिली आहे. परिणामी, आज पासुन या विभागासह संपुर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत पास मिळणार आहे. याकामी माजी आमदार चिमणराव पाटील यांचे सहकार्य लाभल्याची प्रतिक्रिया वासुदेव पाटील यांनी दिली आहे.
gujrat me kab hoga