जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील असोदा सार्वजनिक विद्यालयात पालक शिक्षक संघ व सर्वोदय एज्युकेशन सोसायटीतर्फे दहावीत आलेल्या पहिल्या पाच विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नुकताच घेण्यात आला.
या नियोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विलास चौधरी होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या खाचणे यांनी केले. यावेळी मंचावर संस्थेचे चेअरमन उद्धव पाटील , सचिव कमलाकर सावदेकर, संचालक किशोर चौधरी, सुनील चौधरी, दुर्गादास भोळे, पर्यवेक्षक मिलिंद बागुल, हे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या वेळेस विविध कार्यकारी सोसायटीकडून हुशार गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटप करण्यात आल्या. अध्यक्षीय भाषणात विलास चौधरी म्हटले की, विद्यार्थ्यांनी असेच कठोर परिश्रम करून यशस्वी व्हावे आणि आपल्या असोदा गावाचे नाव उज्ज्वल करावे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमलता सोळंके,तर आभार पी. जे.बह्राटे यांनी केले.