Home Cities रावेर रावेर तालुक्यात घरकुल योजनेच्या चौकशीची जोरदार मागणी

रावेर तालुक्यात घरकुल योजनेच्या चौकशीची जोरदार मागणी


रावेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | रावेर तालुक्यात घरकुल योजनेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. पंचायत समितीमार्फत मंजूर करण्यात आलेल्या घरकुलांची विशेष समितीमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी जनतेतून होत आहे. मंजूर घरकुलं प्रत्यक्षात खरी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचली आहेत का, याची कसून तपासणी व्हावी, अशी मागणी होत आहे.

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत रावेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर निधी वितरित केला जातो. मात्र, खरी गरजू कुटुंबे या योजनेपासून वंचित राहिल्याने दलालांची चलाखी फोफावल्याचे चित्र आहे. तत्कालीन गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल आणि डॉ. सानिया नाकाडे यांच्या कार्यकाळात घरकुल वाटपात घोळ झाल्याची चर्चा सर्वत्र ऐकायला मिळते.

याप्रकरणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. मीनल करनवाल यांनी रावेर तालुक्यातील घरकुल योजनांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.


Protected Content

Play sound