Home धर्म-समाज शेतकर्‍यांना पूर्वसुचना देऊन भुसावळातील भाजीपाला विक्रेत्यांचा बंद ( व्हिडीओ )

शेतकर्‍यांना पूर्वसुचना देऊन भुसावळातील भाजीपाला विक्रेत्यांचा बंद ( व्हिडीओ )

0
39

भुसावळ प्रतिनिधी । आधी शेतकर्‍यांना पूर्वसुचना देऊन आज शहरातील भाजीपाला विक्रेत्यांनी बंद पाळून शहिदांना आदरांजली अर्पण केली.

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी आज शहरातील सब्जीमंडीतील विक्रेत्यांनी कडकडीत बंद पाळला. यामुळे पूर्ण बाजार बंद होता. यानंतर भाजीपाला विक्रेत्यांनी मोर्चा काढून आपला निषेध व्यक्त केला. दरम्यान, या बंदमुळे शेतकर्‍यांचे नुकसान होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात आली. भाजीपाला विक्रेत्यांनी शेतकर्‍यांना आधीच पूर्वसुचना देऊन हा बंद पाळत, शहिदांना आदरांजली अर्पण केली. दरम्यान, विक्रेत्यांनी शहरातून निषेध मोर्चा काढला. यात सब्जीमंडीतील लहान-मोठे विक्रेते सहभागी झाले होते.

पहा– भुसावळातील बंदबाबतचा हा व्हिडीओ.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound