Home क्राईम दोन मुलींवर अत्याचार करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा करा (व्हिडीओ)

दोन मुलींवर अत्याचार करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा करा (व्हिडीओ)


जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील दोन चिमुकल्या मुलींसोबत अश्लील चाळे करत अत्याचार करणाऱ्या संशयित आरोपी वृध्दाला कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणीचे निवेदन जळगाव तेली समाजासह शिवसेना महिला आघाडीच्या वतीने जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांना बुधवा २३ फेब्रुवारी रोजी दुपारी निवेदन देण्यात आले.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धरणगाव तालुक्यात दोन चिमुकल्या मुलींसोबत २० फेब्रुवारी रोजी अश्लील चाळे करत अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेविरोधात जनमाणसात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. अत्याचार  करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे यासाठी नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.  जळगावातील तेली समाजासह शिवसेना महिला आघाडीतर्फे पोलिस अधीक्षक कार्यालयात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले.

 

आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे अशी जोरदार घोषणाबाजी करत पोलिस अधीक्षक कार्यालयात आंदोलन करण्यात आले तसेच पोलिस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांना बुधवार २३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.  हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा तसेच खटल्यात सरकारी वकील म्हणून अँड. केतन ढाके यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनात शिवसेना महिला आघाडीच्या सरिता माळी- कोल्हे शोभा चौधरी, यांच्यासह महिलाही सहभागी झाल्या.


Protected Content

Play sound