गणिताच्या पेपरला कडेकोट बंदोबस्त; कॉपीमुक्त परीक्षा

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दहावीच्या इंग्रजीच्या पेपरला काही प्रमाणात कॉप्यांचे प्रकार समोर आल्यानंतर, गणिताच्या पेपरला शिक्षण विभाग आणि जिल्हा प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त लावला होता. जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. त्यामुळे जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर कॉप्यांचे प्रकार घडले नाहीत. गणिताचा पेपर सोपा असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले, मात्र कॉपी करणे अवघड झाल्याचे चित्र जिल्ह्यातील केंद्रांवर शुक्रवारी (७ मार्च) होते.

परीक्षा केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त:
सकाळी साडेदहा वाजता गणिताच्या पेपरला सुरुवात झाली. जिल्ह्यातील सर्वच केंद्रांवर पोलिसांचा खडा पहारा होता. केंद्राच्या परिसरात पालकांनाही थांबण्याची परवानगी नव्हती. गेल्या सात-आठ वर्षांत प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपात बदल झाले आहेत. गणिताची भीती दूर व्हावी म्हणून कृतीयुक्त प्रश्नपत्रिका तयार करण्यात आली आहे. ज्ञान, आकलन, उपयोजित कौशल्यावर आधारित सामान्य विद्यार्थीही सहज उत्तीर्ण होऊ शकतील, असेच प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आहे. गणित भाग १ आणि २ चा पेपर अगदी सोपा होता. चौथा आणि पाचवा प्रश्न अवघड गेल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. कारण प्रश्नपत्रिकेचे स्वरूप ४० टक्के मध्यम आणि २० टक्के कठीण आहे. पहिला प्रश्न बहुपर्यायी असून तो अनिवार्य आहे. त्याचे पर्याय गोंधळात टाकणारे असल्याने मुलांना अवघड वाटले. चौथा आणि पाचवा प्रश्न थोडा कठीण विचारण्यात आला. हा चार गुणांसाठीचा प्रश्न अधिक आकडेमोड आणि सरावाच्या अभावामुळेच मुलांना कठीण वाटला. एकूण प्रश्नपत्रिका अत्यंत सोपी होती.

तज्ज्ञांचे मत:
“प्रश्नपत्रिकेचे स्वरूप हे ४० टक्के मध्यम आणि २० टक्के कठीण आहे. पहिला प्रश्न बहुपर्यायी असून तो अनिवार्य आहे. त्याचे पर्याय गोंधळात टाकणारे असल्याने मुलांना अवघड वाटले. चौथा आणि पाचवा प्रश्न थोडा कठीण विचारण्यात आला. हा चार गुणांसाठीचा प्रश्न अधिक आकडेमोड आणि सरावाच्या अभावामुळेच मुलांना तो कठीण वाटला. एकूण प्रश्नपत्रिका अत्यंत सोपी होती,” असे जळगाव जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे अध्यक्ष ललित लामखेडे यांनी सांगितले.

Protected Content