यावल, प्रतिनिधी । कोरोना विषाणु संसर्गाच्या पार्श्वभुमीवर वेगाने वाढत्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काल दि. २० एप्रिल रात्री ८ वाजेपासुन संचारबंदीच्या संदर्भात नवीन कडक निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधानुसार नागरीकांसह सर्व व्यापारी व व्यवसायीकांनी पहील्याच दिवशी कडकडीत बंद पाळून उत्तम प्रतिसाद दिला.
राज्यात मागील काही दिवसापासून कोरोना विषाणुसंसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे सर्वत्र मृत्युचे तांडव सुरू आहे. राज्य शासनाच्या आदेशाने जिल्हाधिकारी अभीजीत राऊत जळगाव जिल्ह्यातील रुग्णांची वाढती संख्या आटोक्यात आणण्याकरीता नविन संचारबंदीची नियमावली जाहीर केली आहे. काल रात्री ८ वाजेपासून या संचारबंदीची अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. आज सकाळच्या ७ वाजेपासुन तर सकाळच्या११ वाजेपर्यंत शहरातील मुख्य मार्गावरील बाजारपेठेत दुकाने सुरू असल्याने नागरीकांची जीवनाश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी एकच गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळाले. मात्र, सकाळी ११ वाजेनंतर रस्ते ओस पडले होते. दरम्यान, यावलचे पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी कालच पोलीस वाहनाव्दारे भ्रमणध्वनीद्वारे शहरातील नागरीकांना सुचना देण्यात आले होत्या. या सुचनांनुसार शहरवासीयांनी आपली व्यवसाय कडकडीत बंद प्रशासनाला साथ दिली आहे. यावल बस आगारातुन प्रवासी नसल्याने अखेर काही मोजक्या सुरू असलेल्या सर्व बसफेऱ्या ही रद्द करण्यात आल्याची माहीती एसटी आगाराच्या सुत्रांकडुन मिळाली आहे. यावलहुन बदलुन गेलेले तत्कालीन पोलीस निरिक्षक अरूण धनवडे हे यावल येथे पुन्हा रूजु झाल्याची ही काही टवाळखोर मंडळीने खोटी अफवा शहरात पसरविल्याने शहरात विविध ठिकाणी धनवडेसाहेब पुन्हा यावल येथे आले का ? अशी चर्चा देखील काही मंडळी करीत असतांना दिसत होती .