Home Cities जळगाव भाऊच्या उद्यानांत पथनाट्याद्वारे मतदान जागृती ( व्हिडीओ )

भाऊच्या उद्यानांत पथनाट्याद्वारे मतदान जागृती ( व्हिडीओ )

0
41

WhatsApp Image 2019 04 08 at 3.01.26 PM

जळगाव (प्रतिनिधी ) जिल्हा प्रशासनाद्वारे मतदानाबाबत मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. यानुसार शहरतील भाऊचे उद्यान येथे मतदार जागृतीसाठी पथनाट्य सादर करण्यात आले. या पथनाट्याच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीत मतदानांची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

 

दिशा संस्थेच्या कलावंतांनी विनोद ढगे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सचिन महाजन, रोशन गांधी, दुर्गेश आंबेडकर,  सुदर्शन पाटील,  आकाश धनगर, अवधूत दलाल,  देवराज शिंपी,  कुणाल राऊळ,  नीलेश जोशी,  मिलिंद पाटील,  गायत्री ठाकूर, जयश्री ठगे आदी कलावंतांच्या पथकाने यात सहभाग घेतला. या पथनाट्यात त्यांनी मतदानाचे महत्व पटवून दिले. तसेच  मतदारांनी कोणत्याही अमिषाला बळी पडू नये असे आवाहन करण्यात आले. यासोबतच व्ही.व्ही.पट या यंत्राच्या कार्यप्रणालीची माहिती देण्यात आली.  याप्रसंगी  जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे,  प्रांताधिकारी दीपमाला चौरे,  शिक्षणाधिकारी डी. पी. महाजन, डॉ. मिलींद बागुल आदी यावेळी उपस्थित होते.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound