जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव ते शिरसोली दरम्यानच्या रेल्वे रूळावर एका अनोळखी ३० ते ४० वर्षीय पुरूषाचा धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने दुदैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी १३ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता समोर आली आहे. याबाबत दुपारी १२ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जळगाव ते शिरसोली दरम्यानच्या रेल्वे रूळावर एका अनोळखी ३० ते ४० वर्षीय पुरूषाचा मृतदेह मिळून आला. दरम्यान धावत्या रेल्वेचा धक्का लागून मृत्यू झाला असल्याची समोर आले. याबाबत रेल्वे लोकोपायलट यांनी या घटनेबाबत जळगाव तालुका पोलीसांना माहिती दिली. त्यानुसार पोलीस कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मयताची ओळख पटेल असे कोणतीही वस्तू व कागद मिळून आले नाही. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रकाश चिंचोरे हे करीत आहे.




