जळगाव, प्रतिनिधी । छञपती शिवाजी महाराज व छञपती संभाजी महाराज यांच्या नावाने सुरू असणाऱ्या तंबाखू बिडी या सारखे धुम्रपान उत्पादन कायम स्वरूपी बंद करण्यात यावे अशी मागणी शिवशंभू संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनाचा आशय असा की, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र भुमीमध्ये छञपती शिवाजी महाराज व छञपती संभाजी महाराज यांच्या नावाने तंबाखू बिडी सारखे उत्पादन करून छञपती शिवाजी महाराज व छञपती संभाजी महाराज यांचे चरित्र बदनाम केले जात आहे.
तरी लवकरात लवकर शिवशंभू प्रेमीच्या भावनेचा आदर करत छञपती शिवाजी महाराज व छञपती संभाजी महाराज यांच्या नावाने सुरू असलेली तंबाखू व बिडी सारख्या उत्पादनावर बंदी आणावी.अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवशंभू संघटनेतर्फे देण्यात आला आहे. याप्रसंगी अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष सोपान मानकर, आनंद घुगे, विशाल पाटील, कृष्णा ठाकूर, महानगर प्रसिद्धी प्रमुख किरण ठाकूर उपस्थित होते.