जळगाव प्रतिनिधी । महिन्याभरात सातत्याने कोरोना रूग्ण अधिक वाढत आहे. त्यात रेमडीसीवीर इंजेक्शन काळा बाजार, औषधींचा तुटवडा, बेड, व्हेंटीलेटर उपलब्ध नसणे अश्या अनेक तक्रारींमुळे जनतेचे मोठ्या प्रमाणे हेळसांड होत आहे. जनतेचे हाल थांबवा अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा आज मंगळवारी २० एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळ यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेवून दिली.
यासंदर्भात भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे यांनी सांगितले की, गेल्या महिना व दीड महिन्यांपासून कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यशासन कोरोना आटोक्यात आणण्यासाठी सपशेल झाले आहे. जिल्ह्यात सध्या कोरोना रूग्णांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे. जिल्ह्यात रेमडीसीवीर इंजेक्शन हे गरजू रूग्णांना तातडीने उपलब्ध होत नाही. इंजेक्शनसाठी रूग्णाच्या नातेवाईकांना फिरवाफिरव केली जात आहे. शिवाय इंजेक्शन चढ्या भावाने दिले आहे. दुसरी कोवीड केअर सेंटरमध्ये बेड व व्हेंटीलेटर उपलब्ध होण्यास रूग्णांना दिवसभर थांबावे लागत आहे. यात नातेवाईकांची हेळसांड होते. हा प्रकार कुठेतरी थांबावा यासाठी भारतीय जनता पार्टीने यापुर्वी जिल्हा प्रशासनाला चार वेळा भेट घेवून समस्यांबाबत चर्चा केली. परंतू जनतेच्या तक्रारी पुन्हा उपस्थित झाल्या आहे. त्यामुळे आता पाचव्यांना भाजपाचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेवून सविस्तर चर्चा केली आहे अशी माहिती दिली.
याप्रसंगी आमदार राजूमामा भोळे, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेश पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार संजय सावकारे, भाजपा महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, मनपा स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
https://www.facebook.com/508992935887325/videos/489549608915236