मुक्ताईनगर प्रतिनिधी । इंदोर- औरंगाबाद या मार्गाने जाणारे सर्व मालवाहतूक लोडिंग गाड्यांचा सर्रास वापर हा मुक्ताईनगरातून होत असून ही वाहतूक पूर्णाड फाटा ते संत मुक्ताई साखर कारखाना चौक नॅशनल हायवे नं.६या बायपास मार्गे करण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा डॉ. विवेक सोनवणे यांनी दिलेल्या निवेदनावेळी देण्यात आला आहे.
मुक्ताईनगर शहरातील मुख्य बाजारपेठ ही या मेन रोडवरच असून हा रोड सदैव गजबजलेला असून या रोडवर नेहमी गर्दी असते. व या आधी या मालवाहतूक लोडिंग गाड्यांच्या निष्काळजीपणामुळे जीवित हानी सुद्धा झालेली आहे. या संबंधात मुक्ताईनगर पोलिस स्टेशनमध्ये सुद्धा गुन्हा नोंद आहे. बऱ्याच वेळेस वाहनचालक नशेच्या अवस्थेत भरधाव वेगाने गाड्या शहराच्या भर चौकातून नेत असल्यामुळे वेळोवेळी तुरळक घटना घडल्याचेही नमूद आहे व अजून काही अनिष्ट अनुचित प्रकार घडू नये व जीवित हानी होऊ नये, यासाठी ही मालवाहतूक लोडिंग गाड्यांची वाहतूक ही पूर्णाड फाटा ते संत मुक्ताई साखर कारखाना चौक नॅशनल हायवे नं.६या बायपास मार्गे करण्यात यावी अन्यथा आंदोलन करणार डॉ. विवेक सोनवणे यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.