ओला दुष्काळ जाहीर करून विमा कंपनी शेतकऱ्यांची लुट थांबवा; सुनील देवरेंचे तहसीलदारांना निवेदन

पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी l पारोळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झालेला आहे तरी तालुक्यात पंचनामा करण्यात येऊन ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच पिक विमा कंपनी प्रतिनिधींची शेतकऱ्यांकडून करोडो ची लुट थांबवावी.

सविस्तर वृत्त असे की पारोळासह जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असून त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात अशी नुकसान झालेले आहे. त्यात विशेष करून कापूस मका ज्वारी, बाजरी हे सर्व पीक जमीनदोस्त झालेले आहे. शेतकरी हवालदिल झालेला असून तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे हे होत असताना सन 2023 या वर्षात शेतकऱ्यांनी आपल्या शेतात नुकसान झाल्याची पिक विमा कंपनीकडे तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने तालुक्यातील पीक विमा कंपनी प्रतिनिधी व थर्ड पार्टी सर्वे करणाऱ्या तालुका प्रतिनिधी यांनी शेतकऱ्यांना तुम्हाला पिक विमा नुकसान भरपाईचे हेक्टरी 35000 नुकसान भरपाई मिळवून देऊ असे आमीश दाखवून प्रति हेक्टरी 2000 ते 5000 अशी रक्कम गोळा करून घेतली आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करून तालुक्यातून लाखो नाहीतर करोड रुपये गोळा करून घेतले आणि त्या शेतकऱ्यांना उंबरठा उत्पन्नानुसार नुकसान भरपाई मिळाली या संदर्भातील माहिती असताना सुद्धा सदर दोन्ही पिक विमा प्रतिनिधी यांनी संगनमताने शेतकऱ्यांची लूट केली यात पंचनामा करतेवेळी कृषी सहाय्यक व पिक विम्याचे प्रतिनिधी यांची संयुक्तिक पंचनामा सही असते म्हणून या सगळ्यांमध्ये कृषी विभागाचे अधिकारीही सामील तर नाहीत ना? असा प्रश्न निर्माण होतो ? हे होत असताना देखील तालुका,जिल्हा शासकीय अधिकारी यांच्या लक्षात येऊ नये ही ? संशयास्पद बाब लक्षात येते संबंधित अधिकारींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी चे निवेदन महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व शेतकरी नेते सुनील देवरे यांनी तालुका कृषी अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे केले आहे संबंधितांवर कारवाई न झाल्यास महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल.

Protected Content