पहुर, ता जामनेर प्रतिनिधी । पहूर पोलीस स्टेशन हद्दीतील पहूर परिसरातील अवैध धंदे बंद करा अशी मागणी किरण जाधव यांनी जिल्हापोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदना द्वारे केली आहे.
जिल्हापोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,जामनेर तालुक्यातील पहूर पोलीस स्टेशन असलेल्या पहूर गावातच सट्टे व इतरत्र अवैध धंदे खुलेआम सुरू आहे. अवैध धंदे खुलेआम सुरू असल्याने अनेकांच्या संसाराची राखरांगोळी होण्याची शक्यता असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता असल्याची चर्चा पहूर परिसरात सुरू आहे. त्यामुळे आपण पहूर परिसरात खुलेआम सुरू असलेले सट्टे व इतरत्र अवैध धंदे कडकडीत बंद करावे.
आपण पहूर पोलीस स्टेशनला भेट दिली त्यावेळेस आम्ही पत्रकार बांधवांनी पहूर परिसरातील अवैध धंदे बंद करावे अशी तोंडी मागणी आपल्याकडे केली होती. आपण अवैध धंदे बंद करावे असे पहूर पोलिसांना आदेश दिले असल्याची चर्चा पहूर परिसरात सुरू आहे. मात्र अजुनही पहूर परिसरातील अवैध धंदे खुलेआम सुरू आहे. तरी आपण याकडे लक्ष देवून पहुर परिसरातील अवैध धंदे कडकडीत बंद करावे अशी विनंती असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री, गृहमंत्री, गृह सचिव, पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त, उपविभागीय पोलीस अधिकारी यांना पाठविण्यात आल्या आहेत.