स्टॉप डायरिया अभियान कार्यशाळा संपन्न

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद तर्फे स्टॉप डायरिया(अतिसार थांबवा) या अभियानाची कार्यशाळा घेण्यात आली तसेच 8 जुलै ते 7 ऑगष्ट दरम्यान सुरु झालेल्या “स्वच्छ्तेचे दोन रंग ओला हिरवा सुका निळा”या मोहिमेचे उदघाट्न करण्यात आले.

छत्रपती शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी(सा.प्र.वि) स्नेहा कुडचे पवार,उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, प्रकल्प संचालक भरत कोसोदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर आदी उपस्थित होते. यावेळी मुख्य प्रशिक्षक म्हणून सेवानिवृत्त जिल्हा आरोग्य अधिकारी बी.आर.पाटील यांनी बालमृत्यू व अतिसार यांची सांगड घालत अतिसराचे प्रकार विस्तृत पणे सांगितले तसेच त्यासाठी काय उपाय योजना कराव्या याबाबत मार्गदर्शन करून,पाणी हाताळणी व हाथ धुण्याचे फायदे हे प्रत्यक्षिक करून विषद केले.

रसायनी राजेंद्र पाटील यांनी जैविक व रासायनिक पाणी तपासणी याबाबत मार्गदर्शन केले.यावेळी गटविकास अधिकारी,तालुका आरोग्य अधिकारी,सी,डी.पी.ओ, गटशिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी आरोग्य ,पंचायत उपस्थित होते. प्रास्ताविक प्रकल्प संचालक भरत कोसोदे यांनी केले,सूत्रसंचालन क्षमता बांधणी तज्ञ मनोहर सोनवणे यांनी केले.

 

 

Protected Content