जळगाव प्रतिनिधी । दारूच्या नशेत तरूणाला मध्यरात्री घरात घसल्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने शहरातील गवळीवाड्यात आज सकाळी दगडफेक झाल्याची खळबळजनक घटना घडली असून याप्रकरणी ४ जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यात चार जणांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, भोलासिंग जगदीशसिंग बावरी (वय-३२) रा. तांबापूरा हा शुक्रवारी मध्यरात्री २.३० वाजेच्या गवळीवाड्यातील रवि हटकर यांच्या घरात घुसला. त्यावेळी रवी यांच्या घरात महिला ह्या एकट्याच होत्या. त्याला हटकले असता त्याने घरातून पळ काढला. दरम्यान, हा प्रकार लक्षात आल्यानंतर रवी हटकर यांनी आज सकाळी ८.३० वाजता जाब विचारला असता त्याचा राग आल्याने भोलासिंग जगदीशसिं बावरी, वडील जगदीशसिंग हरीसिंग बावरी (वय-५०), आई सतकौर जगदीशसिंग बावरी (वय-४५), मोहनसिंग उर्फ मोनूसिंग जगदीशसिंग बावरी आणि भाऊ सोनूसिंग जगदीशसिंग बावरी सर्व रा. ताबापूरा हे सर्वजण गवळीवाड्यात चालून आले. त्यांना हटकर यांच्या घरावर दगडफेक केली. या दगडफेकीत उखा खंडू हटकर (वय-४५) रा. गवळीवाडा आणि भोलासिंग हे दोघे किरकोळ जखमी झाले आहे.
घटनास्थळी एमआयडीसी पोलीसांची धाव
आज सकाळी ८.३० वाजता पोलीसांनी धाव घेतली. यावेळी अपर पोलीस अधिक्षक डॉ. नीलाभ रोहन, पोलीस निरीक्षक विनायक लोकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, अशोक संगत, गोविंदा पाटील, इम्रान सय्यद, जितेंद्र राजपूत, चंद्रकांत पाटील, नितीन पाटील, लुकमान तडवी, असीम तडवी, दीपक चौधरी, गोपनीय शाखेचे तुकाराम निंबाळकर, ललित गवळे, सतिश गर्जे, सिध्देश्वर धापकर, महिला पोलीस मालती वाडीया, महिला होमगार्ड मंदा बैसाणे, बिनीता राजपूत, पूनम सोनवणे, होमगार्ड, आरसीबी पथक, क्यू.आर.टी. पथक, निर्भया पथक व जळगाव शहरातील पोलीस स्थानकातून मागविण्यात आलेले अतिरिक्त कुमक उपस्थित होते. घटनास्थळी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे.
मध्यरात्री पेट्रोल पंपावर हुज्जत
भोलासिंग बावरी यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशन, रामानंद नगर पोलीस स्टेशन, शहर व जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात धाडसी घरफोडीसह इतर विविध गुन्हा दाखल आहे. कालच्या घटनेत घरात एकट्या असलेल्या महिलेने त्याला हटकले असता त्याने घरातून पळ काढला होता. तो थेट पांडे चौकातील अमर पेट्रोल पंपावर येवून येथील कामागारांना धमकी व हुज्जत घालत पेट्रोलची मागणी करत होता. शेवटी काही कर्मचाऱ्यांनी त्यांच्या दुचाकीतून एक लिटर पेट्रोल काढून दिले. अशी माहिती पेट्रोलपंपावर रात्री गस्त असलेल्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.