गुजरातमध्ये पुन्हा अंमली पदार्थांचा साठा जप्त

अहमदाबाद वृत्तसंस्था | गुजरात एटीएसने द्वारका येथे अंमली पदार्थांचा साठा जप्त केला असून याचे मूल्य सुमारे १२० कोटी रूपये इतके आहे.

 

गुजरातमधील द्वारकामध्ये एटीएसनं मोठी कारवाई केली आहे. द्वारकामधील नवाद्रा गावात एका घरातून २४ किलोचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. त्याची बाजारातील किंमत १२० कोटी रुपये आहे. या प्रकरणी एटीएसनं तिघांना ताब्यात घेतलं आहे. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवलखी बंदराजवळ असलेल्या जिनजुदा गावाजवळून जवळपास १२० किलोचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. यानंतर तिघांना अटक करण्यात आली. एटीएसनं स्थानिक पोलिसांच्या मदतीनं ही कारवाई केली.

 

काही दिवसांपूर्वीच गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील एका गावातून एटीएसनं १२० किलो अमली पदार्थ जप्त केले होते. त्याचं बाजारमूल्य जवळपास ६०० कोटी रुपये इतकं होतं. या प्रकरणाचा तपास करणार्‍या एटीएसच्या हाती आज आणखी एक यश लागलं. या प्रकरणाचे धागेदोरे पंजाब, राजस्थान आणि महाराष्ट्रापर्यंत जात असल्याचा दावा एटीएसनं केला.

Protected Content