अभिनेत्री लैला खान हत्याप्रकरणी सावत्र वडील दोषी; मुंबई सत्र न्यायालयाचा निकाल

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अभिनेत्री लैला खान हत्येप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने तिच्या सावत्र वडिलांना दोषी ठरवले आहे. २०११ साली लैला खान आणि तिच्या कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आली होती. या घटनेच्या १४ वर्षांनतर तिच्या सावत्र वडिलांना कोर्टाने दोषी ठरवले आहे. परवेज ताक असे आरोपी सावत्र वडिलांचे नाव आहे. हत्या करून मृतदेह इगतपुरीच्या फार्म हाऊसमध्ये पुरवण्यात आले आणि घटना झाल्याच्या एक वर्षांनंतर सर्व मृतदेह सापडले. परवेज हा लैलाच्या आईचा तिसरा पती होता. परवेजने लैलाच्या आईच्या मालमत्तेवरुन झालेल्या वादानंतर आधी तिची नंतर लैला आणि तिच्या चार भाऊंची सुध्दा हत्या केली होती. असा पोलिसांचा आरोप आहे. खुनाचा कट रचने, खून करणे, पुरावे नष्ट करणे याप्रकरणी न्यायालयाने परवेजला दोषी ठरवले आहे.

लैला खानचे खरे नाव रेश्मा पटेल असे आहे. लैला खानने ‘वफा : अ डेडली लव्ह स्टोरी’च्या माध्यमातून 2008 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात ती राजेश खन्नासोबत झळकली. या चित्रपटांतील बोल्ड सीन्समुळे लैला चर्चेत आली. लैला खान आणि राजेश खन्ना यांच्यातील बोल्ड सीन्स या चित्रपटासाठी चित्रीत करण्यात आले होते. 30 जानेवारी 2011 मध्ये लैलाची हत्या झाली. मुनीर खानसोबत अभिनेत्रीचं लग्न झालं होतं. नादिर शाह पटेल हे लैलाच्या वडिलांचं नाव असून शेलिना पटेल असं तिच्या आईचं नाव आहे.

Protected Content