जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरापासून जवळ असलेल्या खेडी गावातील शंभू रेसिडेन्सी येथे एकाच रात्री तीन ठिकाणी घर फोडून करून सुमारे २ लाख ९२ हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना सोमवारी १३ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी मंगळवारी १४ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरपासून जवळ असलेल्या खेडी गावातील शंभू रेसिडेन्सी येथे रविंद्र जगन्नाथ मगरे वय ४८ हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहेत. व्यापार करून ते आपला उदरनिर्वाह करतात. सोमवारी १३ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास त्यांचे घर बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातून सोन्याचे-चांदीचे दागिने असा एकुण २ लाखा १७ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना सायंकाळी ६ वाजता उघडकीला आले. दरम्यान अधिक चौकशी केली असता गावातील राजेश सिताराम पाटील यांच्या घरातून ३७ हजार ७०० रूपयांचे दागिने आणि भगवान बाबुराव माळी यांच्या घरातील लोखंडी कपाटातून ३८ हजार रूपये किंमतीचे सोन्याचांदीचे दागिने चोरून नेले. तिघे घरांतून एकुण २ लाख ९२ हजार ७०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे समोर आले. याप्रकरणी रविंद्र मगरे यांनी एमआयडीसी पोलीसात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून बुधवारी १४ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहूल तायडे हे करीत आहे.