जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉपजवळील दुकानाच्या पायरीवर बसलेल्या वृध्द महिलेचा पाच हजार रूपये ठेवलेली पैशांची पिशवी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना शुक्रवारी १८ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता घडली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरात सुमनबाई नारायण पाटील (वय-६२) या वृध्द महिला एकट्याच वास्तव्याला आहे. धुणंभांडी करून आपला उदरनिर्वाह करतात. शुक्रवारी १८ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता वृध्द महिला सुमनबाई पाटील ह्या धुणंभांडी करण्यासाठी जळगाव शहरातील गोंविंदा रिक्षा स्टॉप जवळील गायत्री फर्निचर दुकानासमोर आले. वृध्द असल्याने थोडा थकवा वाटू लागल्याने दुकानाच्या पायऱ्यावर बसल्या. त्यावेळी त्यांच्या कमरेला असलेली पैशांची पिशवी बाजूला ठेवली. त्यावेळी एक अज्ञात व्यक्तीने बाजूला बसण्याचे सांगून त्यांची ५ हजार रूपये रोकड ठेवलेली पैशांची पिशवी घेवून पसार झाला. वृध्द महिलेने आरडाओरड केली तोपर्यंत चोरटा पसार झाला होता. महिलेने शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील करीत आहे.