भुसावळ प्रतिनिधी । येथील रेल्वे स्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा शिवजयंतीच्या रात्री बसविण्यात आला आहे.
याबाबत वृत्तांत असा की, भुसावळ रेल्वे स्थानकाबाहेर ऐंशीच्या दशकात समाजसेवक दौलतराव हिंगणे यांनी गनिमी काव्याचा वापर करून रात्रीतून पुतळा बसविला होता. यानंतर अलीकडच्या काळात शहरात भव्य अश्वारूढ पुतळा बसविण्याची मागणी करण्यात येत होती. या अनुषंगाने आज तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होत असतांना पहाटे अडीच वाजेच्या सुमारास रेल्वे स्थानकाबाहेर भव्य अश्वारूढ पुतळा बसविण्यात आला आहे. आमदार संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष रमण भोळे, माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, मराठा समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्र आवटे, संजय आवटे आदींसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे यासाठी सहकार्य लाभले.
याप्रसंगी आमदार संजय सावकारे म्हणाले की, रेल्वे स्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा शहरातील सर्व जाती-धर्माच्या नागरिकांसाठी प्रेरणास्थान बनणार आहे.
पहा : भुसावळातील शिवरायांच्या पुतळ्याबाबतचा हा व्हिडीओ.