प्रभारी कलासंचालक राजीव मिश्रा यांच्या राजीनाम्यासाठी राज्यभर आंदोलन

 

चोपडा, प्रतिनिधी । प्रभारी कलासंचालक राजीव मिश्रा यांच्या मनमानी व भ्रष्ट कारभारामुळे राज्यातील कला महाविद्यालये बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. कला संचालक कला क्षेत्रातील नसल्यामुळे हा गोंधळ निर्माण झाला असून त्यांनी महाकॅटच्या पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याने मिश्रा यांनी संघटनेची माफी मागून राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

प्रभारी कलासंचालक राजीव मिश्रा यांच्या मनमानी कारभाराविरोधात महाकॅटकडून आवाज उठवला असतांना प्रभारी कला संचालक राजीव मिश्रा यांनी महा कॅटनाचे उपाध्यक्ष प्रा. बाळासाहेब पाटील यांना व महाकॅटनालाही शिवीगाळ केली. याबाबतची तक्रार तीनही संघटनांच्या वतीने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे करण्यात अली आहे. संघटनेला किंवा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला अशा पद्धतीने धमकावणे , शिवीगाळ करणे हे कला संचालक पदाला शोभणारे नाही.

कला संचालकांनी संघटनेचा अपमान केला आहे त्यामुळे सदर प्रकरणी विद्यमान प्रभारी कला संचालक राजीव मिश्रा यांनी संघटनेची माफी मागून राजीनामा दयावा , अशी तीनही संघटनेची आग्रही मागणी आहे . राजीव मिश्रा जोपर्यंत राजीनामा देणार नाहीत तोपर्यंत कला महाविद्यालयातील कामकाज काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करीत केले जाईल अशी तीनही संघटनांनी भूमिका घेतली आहे.

राज्यातील सर्व कला महाविद्यालयातील कर्मचाऱ्यानी आजपासून या घटनेच्या विरोधात काळ्या फिती लावून आंदोलन छेडले आहे. या आंदोलनांमध्ये ललित कला केंद्र, या महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले आहेत. या कला महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला असून विद्यमान प्रभारी कलासंचालक राजीनामा देणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे. आंदोलनात प्राचार्य राजेंद्र महाजन, प्रा. सुनील बारी. प्रा.विनोद पाटील , प्रा.संजय नेवे, भगवान बारी, अतुल अडावदकर , प्रविण मानकरी आदी सहभागी झाले होते.

Protected Content