अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदचे आदिवासी प्रकल्प अधिकारी यांना विविध समस्याबाबत निवेदन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत येणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध समस्या संदर्भात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदच्या वतीने संघटनेचे युवा प्रदेश अध्यक्ष अॅड. दारासिंग पावरा यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांना देण्यात आले असुन, या मागण्याबाबत आपण त्वरीत लक्ष देऊन समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन यावेळी प्रकल्प अधिकारी पवार यांनी दिले.

अखिल आदिवासी विकास परिषदच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाव्दारे करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या जळगाव जिल्ह्यासह चोपडा तालुक्यातील सर्व पात्र विद्यार्थ्यांना तात्काळ प्रवेश देण्यात यावे, डीबीटी निर्वाह भत्ता ड्रेस कोड अॅपरोनची रक्कम तात्काळ देण्यात यावी, शासकीय आदिवासी आश्रम शाळा मधील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात यावे, शिक्षणशास्त्र महाविद्यालय चोपडा, भगिनी मंडळ नर्सिंग कॉलेज, चोपडा व डॉ. सुरेश पाटील नर्सिंग कॉलेज, चोपडा या कॉलेजच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची बाकी असलेली २०१७-२o१८रक्कम त्वरीत देण्यात यावी.

त्याचप्रमाणे पंडीत दीनदयाल संयम योजनेची डीबीटी सह रक्कम देण्यात यावी व मागील वर्षाची बाकी रक्कम त्वरीत अदा करण्यात यावी, नामांकीत इंग्रजी माध्यम शाळेतील पात्र विद्यार्थ्यांना तात्काळ प्रवेश देण्यात यावे, अमळनेर तालुक्यातील दहिवद येथील शासकीय आश्रम शाळेतील मुख्याध्यापक यांची तात्काळ बदली करून त्यांची सखोल चौकशी करून कार्यवाही करावी, शासकीय आदिवासी मुलींचे वस्तीगृह चोपडा येथे विद्यार्थ्यानीसाठी नवीन इमारत देण्यात यावी व शासकीय आदेशानुसार साहित्य पुरविण्यात यावे अशा विविध मागण्यांचे निवेदन प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांना देण्यात आले असुन, या निवेदनावर अॅड. दारासिंग पावरा, संघटनेच्या ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष नामा पावरा, राहुल बारेला, श्रीकांत बारेला, विजय पावरा यांच्या स्वाक्षरी आहेत .

 

Protected Content