एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एरंडोल तालुक्यातील भालगाव येथील गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांना सद्यस्थितीत भेडसावणाऱ्या पाणी टंचाईच्या समस्येसाठी तलावात पाटचारी द्वारे पाणी सोडण्यात यावे यासाठी भालगाव ग्रामस्थांकडून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. सदर तलावाजवळ जवळपास आठ ते दहा गावांचे पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी आहेत या प्रामुख्याने भालगाव, नंदगाव, मराठ खेळे, तुराटखेडे, सावखेडे होळ, विटनेर, बोरगाव खुर्द,बोरगाव बु , भवरखेडे आदी गावांचा समावेश आहे.
सदर गावांना पाणी टंचाईला समोरे जावे लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.जर पाटचारी द्वारे तलावात पाणी सोडल्यास या गावांचा तसेच गुरे ढोरे यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न व परिसरातील शेतकऱ्यांचा शेतीचा प्रश्न सुटू शकतो असे नमूद केले आहे.जिल्हाधिकारी यांच्याकडून तत्काळ दखल घेत संबंधित विभागास आदेश करून लवकरात लवकर पाणी सोडले जाईल असे सांगून ग्रामस्थांना आश्र्वासित करण्यात आले आहे