व्यवसाय सुरू करण्यासाठी व्यापारी संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरात अत्यावश्यक सेवा प्रमाणे इतर व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी शहरातील फुले मार्केट व्यापारी एसोसिएशन व सेंट्रल फुले, केळकर मार्केट व संत कंवरराम मार्केट व्यापारी संघटनेच्या वतीने आज सोमवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे. 

दिलेल्या निवदेनात म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ५ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेपासून लॉकडाऊन जाहीर करून अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा बंद करण्याचे आदेश परित करण्यात आले आहे. १५ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले असल्याने गेल्या महिन्याभरापासून अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद आहे. त्यामुळे व्यापारी बांधवांवर उपासमारी आणि कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.  लॉकडाऊनमुळे दुकान मालकासह दुकानावर काम करणारे कर्मचारी यांचे कुटुंबाचे  उपजिविकेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. एखाद्या सदस्याला काही अडचण निर्माण झाल्यास किंवा काही बरेवाईट झाल्यास शासन, प्रशासन व आपणच सर्वस्वी जबाबदार राहणार आहे. त्यामुळे सर्व व्यापारी बांधवांना कोरोनाचे ठराविक नियम घालून सुचविलेले चार पर्यायापैकी एक पर्यायावर विचार करून व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. 

या निवेदनावर फुले मार्केट व्यापारी एसोसिएशनचे अध्यक्ष हिरानंद मंगवाणी, राजेश वरयानी, अशोक कौरानी, सेंट्रल फुले मार्केटचे रमेश मतानी, भरत समदड़िया, संत कंवरराम मार्केटचे शंकर तलरेजा,  दिलीप मंगवानी, शंकर नाथानी, केळकर मार्केटचे नरेश कांवना, सतीश ओचिरामानी, सुभाष हेमनानी, दीनू वालेचा आदी व्यापारी बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 

Protected Content