चोपडा प्रतिनिधी । चोपडा तालुका व शहर ग्राहक कल्याण फाऊंडेशन तर्फे २४ डिसेंबर रोजी तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात यावा यासाठी निवेदन देण्यात आले.
तहसील कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे व ग्राहक कल्याण फाऊंडेशन च्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना निमंत्रित करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन चोपड्याचे तहसीलदार छगन वाघ यांना देण्यात आले. या कार्यक्रमाला राज्य ग्राहक संरक्षण परीषद अशासकीय सदस्य विकास महाजन हे ग्राहक प्रबोधनासाठी उपस्थित राहणार आहेत. यावेळी तालुकाध्यक्ष योगेश महाजन, उपाध्यक्ष यशवंत बोरसे, सचिव प्रदिप पाटील, शहराध्यक्ष सौ.संध्या महाजन, तालुका संपर्क प्रमुख कैलास महाजन, कार्याध्यक्ष समाधान माळी,सह कार्याध्यक्ष जितेंद्र शिंपी,कार्य.उपाध्यक्ष दिलीप पालीवाल, कोषाध्यक्ष विजय बाविस्कर,सह कार्यवाह विजय दत्तु पाटील व संस्थेचे सदस्य उपस्थित होते.